Share

आमचा वाली कोण? लातूरमधील इंटर्न डॉक्टरांचा प्रश्न; विविध मागण्यासांठी काम बंद आंदोलन

Published On: 

लातूर : कोरोना काळात हजारो रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांवरच आंदोलन करण्याची वेळ आलीय. आश्वासनांचा बाजार बंद करा असा इशारा देत स्व. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेमधील इंटर्न डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. इतकेच नाही तर या डॉक्टरांनी कोव्हीड वार्डात रुजू होण्यासही नकार दिलाय.

राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना डॉक्टरांच्या संपामुळे कोरोना रुग्णांवरील उपचारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील १५४ इंटर्न डॉक्टरांची कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी कोव्हीड वार्डात नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आम्हाला अत्यंत कमी मानधन दिले जात असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केलाय. या डॉक्टरांना १० हजार ८०० रुपये मानधन दिले जाते. मात्र, या डॉक्टरांनी ५० हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली आहे.

वास्तविक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इंटर्न डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्यात येते. त्यामुळे आमचेही मानधन वाढवण्यात यावे, विमा संरक्षण देण्यात यावे, आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने घ्यावी अशा प्रमुख मागण्या या डॉक्टरांनी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!