जयपूर : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना रुग्णांसाठी राज्यात सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयातही कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांचे प्राण यामुळे वाचणार आहे.
आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गेहलोत सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जोडल्या गेलेल्या सर्व परिवारांना मिळणार आहे. राजस्थान राज्य आरोग्य विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांना सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. या योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाने नकार दिला तर त्या रुग्णालयाविरोधात कठोर पाऊल उचलावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.
राजस्थान सरकारने 1 मे 2021 पासून चिरंजीवी योजनेची सुरुवात केली आहे. सरकारच्या या विमा योजनेशी आतापर्यंत 22 लाखापेक्षा अधिक कुटुंब जोडले गेले आहेत. 3 हजार 500 कोटी रुपयांच्या या योजनेत राज्यातील प्रत्येक परिवाराला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक विमा कव्हर मिळणार आहे. या योजनेशी जोडले जाण्यासाठी सरकारने 31 मे 2021 ची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनेही आपल्या राज्यात कोरोना रुग्णांसाठी सरकारी दवाखान्यात सोबत खासगी दवाखान्यातही कोरोना रुग्णांसाठी मोफत देण्याची योजना राबवावी, अशी मागणी शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सावरतोय : नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट तर ६० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- ‘खट्याळ मुलं पण शांत होतात, पण यांचा थयथयाट थांबत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
