Share

नांदेडचा ऑक्सिजन टँकर पळवला; अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन आणि मग…

Published On: 

नागपूर : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना आटोक्यात येण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरींकडेच कोरोना लढाईची सूत्रे सोपवावीत अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, गडकरी यांनी आज भाजप नागपूर महानगर कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीच्या समारोपावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा ऑक्सिजन पुरवठ्याबाबत होणाऱ्या काळ्या बाजाराबाबत गडकरींना फोन आल्यानंतर त्यांनी काय केले हे देखील सांगितले. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने इतर राज्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. मात्र, नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. यासंबंधी अशोक चव्हाण यांनी गडकरींना फोन केला होता.

याबाबत गडकरी म्हणाले, ‘अशोक चव्हाण यांचा आपल्याला फोन आला. त्या ट्रान्सपोर्टरने आपल्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. त्यानंतर त्याचे टँकर जप्त केले. मी रात्री 12 – 1 वाजता त्या ट्रान्सपोर्टला फोन केला आणि त्याला दाब टाकला. त्याला सांगितलं ही हे बरोबर नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई करु.’ यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!