Share

Omicron Corona : मुंबईत कोरोनाचे रौद्र रुप, दिवसात १३७७ जण पॉझिटीव्ह

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई शहरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या चोविस तासांत मुंबईत १ हजार ३७७ जणांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत सर्वाधिक ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत १६५ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रात १६७ रुग्ण आहेत. देशात २ डिसेंबर रोजी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर १५ दिवसांत तब्बल १०० रुग्ण बाधित झाले होते. तेव्हापासून रुग्णांची संख्या वाढतच आहे.

दिल्ली शहरामध्ये मागच्या चोविस तासांत एकूण ४९६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे दिल्ली सरकारने येलो अलर्ट सह रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत जमाव बंदी लागू केली आहे. दिल्लीत ओमायक्रॉन सर्वाधिक वेगाने पसरत आहे. दिल्लीत एका दिवसात ओमायक्रॉनचे ६३ रूग्ण आढळून आले आहेत. तसेच राज्यस्थानमध्ये मंगळवारी कोरोनाचे ९७ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

ओमायक्रॉन रुग्ण : महाराष्ट्र पहिल्या, दिल्ली दुसऱ्या तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १६७ ओमायक्रॉन रुग्ण आहेत. तर दिल्लीत १६५ ओमायक्रॉन रुग्ण असून दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गुजरातमध्ये ७३ रुग्ण असून गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच देशात एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ६५३ झाली आहे. सोमवारी दिवसभरात देशात एकूण १३५ ओमायक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी गोवा आणि मणिपूर राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर एकूण २१ राज्यांमध्ये ओमायक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. देशात ओमायक्रॉनची लागण झालेल्या ६५३ रुग्णांपैकी १८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!