🕒 1 min read
सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला प्रकरणी परब यांनी नितेश राणेंविरोधात (Nitesh Rane) तक्रार दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी (Kankawli Police) चौकशीसाठी बोलावले होते. मात्र नितेश राणे हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी काल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg District Sessions Court) निलेश राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी सुनावणी झाली. ती न्यायालयाने फेटाळली आहे. आज (२९ डिसेंबर) दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी होणार असून नितेश राणेंना जेल की बेल? हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी नारायण राणेंना (Narayan Rane) पत्रकार परिषदेत नितेश राणेंबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नारायण राणेंनी नितेश राणे कुठे आहेत हे मी का सांगू असे वक्तव्य केले होते. त्यामुळे प्रकरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने नितेश राणेंच्या अटकेसाठी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यानंतर वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही झाली. यामुळे राजकीय घटनाघडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाआघाडीचे प्रचारप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. त्यातला एक जण हा नीतेश राणेंच्या स्वाभिमानचा पुण्यातील कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला नीतेश राणे आणि गोट्या सावंत ह्या दोघांच्या सांगण्यावरुन केल्याचा आरोप फिर्यादी संतोष परब यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग न्यायालय आज काय निकाल देते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात दरेकरांनी मांडला अविश्वास ठराव
- 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर
- तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार
- नारायण राणेंकडून भास्कर जाधवांना ‘नाचा’ची उपमा

