Share

जामीन अर्ज फेटाळल्याने ऑलिम्पिक कुस्तीपटु सुशीलकुमार अडचणीत वाढ; कुठल्याही क्षणी होणार अटक

Published On: 

दिल्ली : दिल्ली येथे ५ मे रोजी छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये मोठा दंगा झाला होता. या वेळी कुस्तीपटुंच्या झालेल्या जबरदस्त हाणामारी झाली होती. या हाणामारीत पाच जण जखमी झाले होते. तर सागर राणा या कुस्तीपटुचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. याप्रकरणी मॉडेल टाऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात सुशील कुमार विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. या वॉरंटच्या विरोधात सुशीलने अटकपुर्व जामिनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज केला होता. मात्र दिल्ली न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळला. त्यामुळे सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला कुठल्याही क्षणी अटक होउ शकते. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुशीलची माहिती देणाऱ्यासाठी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. तर त्याच्या साथीदारासाठी ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे.

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांत ४ मे रोजी खडाजंगी उडाली होती. त्यात हरियाणाच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या सागर राणाचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. सुशीलकुमारनं २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य तर २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!