मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. मात्र हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.
या प्रकरणातील दोषी आढळलेला गोलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्टने काही दिवसापुर्वी एका मुलाखतीत बोलताना या प्रकरणाची माहिती संघातील गोलंदाजांना सुद्धा होती असा आरोप केला. या आरोपानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर विविध स्तरातुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या मात्र त्या सामन्यातील सहभागी गोलंदाजानी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता या सामन्यातील गोलंदाजानी याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करत त्यांची बाजु मांडली आहे.
https://www.instagram.com/p/CPAal2MBQD8/
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या त्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असलेले मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड आणि नॅथन लॉयन या गोलंदाजानी पुढे येत स्पष्टीकरण दिले आहे. या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की,’ ज्यावेळी मोठ्या स्क्रीनवर सँडपेपर मैदानावर असल्याचे फोटो पाहिले, त्याचवेळी आम्हाला या प्रकरणाबद्दल कळाले. त्या क्षणाआगोदर आम्हाला याबाबत काहीही कल्पना नव्हती. सँडपेपर चेंडूवर घासल्याने चेंडूत बदल झाल्याचे तर आम्हाला कळाले असेल, असा अंदाज काही लोकांनी बांधला होता. मात्र खरी परिस्थीती अशी होती की, चेंडू जेव्हा पंचांनी पाहिला, तेव्हा त्यानाही चेंडुत काही बदल जाणवला नाही. त्यामुळे आमच्यावरील आरोप हे बीनबुडाचे आहे.’ असे ते या प्रसिद्धी पत्रकात म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
- ‘मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावला मग भाजप नेमके कोणाविरूद्ध आंदोलन करते’
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती…’
- ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली – उद्धव ठाकरे


