Share

पीएम केअर निधीतून आलेल्या नादुरुस्त व्हेंटीलेटर्सची चौकशी करणार, मविआतील नेत्यांना देसाईंचा शब्द!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजूनही आपली कोरोना विरुध्दची लढाई संपलेली नाही. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, डॉक्टर्स यांच्यातील एकजूट व समन्वयाने आपण कोरोनाला निश्चित हरवू, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (दि.१७) आढावा बैठकीत केला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेंटिललेटर्स विषयी नाराजीचा सूर काढला. त्यामुळे नादुरुस्त व्हेंटीलेटर्सची चौकशी देखील करणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री देसाई यांनी जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा सोमवारी आढावा घेतला. यात नादुरुस्त व्हेंटिलेटर, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण मोहीम, खाजगी रुग्णालय आकारत असलेले वाढीव दराची बिले, ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती, तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दरम्यान, पालकमंत्री देसाई म्हणाले की, पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची बाब धक्कादायक आहे. याची दखल घेत कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, राज्य शासनाकडून रुग्णांसाठी यापूर्वी चांगले व्हेंटीलेंटर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापुढेही चांगल्या दर्जाचे व्हेटिलेटर्स उपलब्ध करुन दिले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

बैठकीत खा. जलील यांनी नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणी संबंधित पुरवठा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तसेच शासकीय दंत महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली. आ. संजय शिरसाट यांनी शहरात इतर जिल्हयातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने जिल्हयासाठी अतिरिक्त निधी देण्यासाठी मागणी केली. आ. सतीश चव्हाण यांनी, नादुरुस्त व्हेंटीलेटर परत करावेत, आ. अंबादास दानवे यांनी, मुंबईच्या धर्तीवर जिल्हयात लसीकरण करावे. अशी मागणी केली. आ. बोरनारे यांनी नादुरुस्त व्हेंटीलेटर कोरोना रुग्णांसाठी वापरू नयेत. तसेच वैजापूर तालुक्यात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!