मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वाधीक पदके पटकावली. या स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदकाची कमाई केली. या पदकविजेत्यांचा घेतलेला हा आढावा. यातील सातव्या पदकाचा शिलेदार नीरज चोप्रा.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा अंतिम दिवस होता. स्पर्धेत भारताने ४ कांस्य आणि २ रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र अद्यापही सुवर्णपदकाचा वेध घेणे भारताला अद्यापही शक्य झाले नव्हते. मात्र ७ ऑगस्ट रोजी झालेल्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने इतिहास घडवला आणि भारताला १३ वर्षाच्या कालखंडानंतर पहिले सुवर्णपदक मीळवुन दिले. साखळी फेरीच्या सामन्यात नीरजने ८६.६५ अंतरावर भाला फेकत थेट अंतिम सामन्यात धडक मारली.
या कामगिरीमुळे तो पहिल्या स्थानी होता. अंतिम सामन्यात नीरजने पहिल्या प्रयत्नात भाला ८७.५८ इतक्या दुर फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याच्या भाल्याने ७६.७९ अंतर पार केले. इतर खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र एकही खेळाडू ८६ मीटरच्या पुढे भाला फेकु शकला नाही. यानंतर अखेरच्या प्रयत्नात नीरजने भाला ८५ मीटर अंतरावर फेकला. यावेळी नीरजने मागे वळूनही बघीतले नाही. कारण त्याला माहित होते की सुवर्णपदक आपलेच आहे. यासह नीरज चोप्राने इतिहास रचत भारतासाठी १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रताप सरनाईक यांच्या कामाशी स्पर्धा करा’ ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला
- ‘मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत हे आता कळले’
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘मंत्रालय ते चंद्रपुर मद्यधुंद करण्याचा निर्णय या ठाकरे सरकारने घेतलाय’; भाजपचा हल्लाबोल
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

