मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळीच अधिवेशन रंगतदार असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. याचा प्रत्यय आज पाहिल्या दिवशी झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सर्वांना आला. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार विरोधात भुमिका घेतल्याचे दिसून येते. पण याउलट आजच्या अभिभाषणात राज्यपालांनी सरकारची अनेक मुद्द्यावर स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातला संघर्ष आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. पण महाराष्ट्रात या उलट राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात खटके उडाल्याचे दिसून आले. काही काळ हा संघर्ष टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांना केंद्राचा एजंट म्हणूनही संबोधल्या गेले. यानंतर या वाद शमण्याचे नाव घेत नसताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषणात राज्य सरकारचे अनेक मुद्द्यांवर तोंड भरून कौतुक केल्याने हा वाद आता तरी थांबेल का ? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सरकारच्या कोरोना काळातील केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. “धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं. राज्य सरकारनं कोरोनासंदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. करोना चाचणीसाठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत,” अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.महाराष्ट्र सीमावाद असो किंवा औदयोगिक मंदी यावर सरकारने योग्य ते पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्यातील वाद संपुष्टात तर आला नाही ना अशी चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन
- बीड जिल्ह्यातून राम मंदिरासाठी १ कोटी ४३ लाखांची देणगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
