Share

दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन

Published On: 

बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पेट्रोल पंपावर बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाचा तीव्र निषेध करत पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर तात्काळ कमी करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. तसेच शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक करून महिलांनी आपला निषेध व्यक्त केला.

आंदोलक महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना मागण्यांचे निवेदन दिले. महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ ही सर्वसामान्यांनी परवडणारी नाही. केंद्र शासनाच्या निषेध करुन तात्काळ दर कमी करावेत अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोरोनाबाबत बॅनर लावण्यात आले आहे. त्या फलकाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर, प्रज्ञा खोसे, जिल्हाध्यक्षा संगीता तूपसागर, माधुरी घुमरे, जयश्री वाघमारे, अनिता वाघमारे, शेख गुरलुखजहिन, वनिता चाळक, कुसूम भालेराव, राणीभाभी, ललिता शेरकर इत्यादींनी सहभाग घेतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!