Share

अरे देवा… कोरोना काळात आता पशुवैद्यकीय डॉक्टरांसाठीही वणवण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: जिल्ह्यातील बाजारसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या चारपाच महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने गुरांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबत सतत मागणी, तक्रार तसेच निवेदन करुनही जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अखेर त्या दवाखान्याला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा देखील येथील नागरिकांनी दिला आहे. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

बाजारसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ हे सावंगीसह परिसरातील आठ ते दहा गावासाठी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पाचसहा महिन्या पुर्वी मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची प्रशासकीय बदली झाली. तर सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी सेवातून निवृत्ती झाले. यामुळे येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गेल्या पाचसहा महिन्यापासून जागा रिक्त आहे. त्यात दवाखान्यासाठी अन्य एक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची प्रभारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली.

प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात आला असला तरी देखील ते स्वतः तेथे थांबत नसल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच उपस्थित नसतात. तर येथील एक कर्मचारी जसे जमेल तसे उपचार करुन काम चालवतो. परंतु डॉक्टर नसल्याने गुरांची मोठी गैरसोय होत आहे. सतत मागणीचे निवेदन देऊनही डॉक्टर मिळत नसल्याने पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!