जालना : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याच्यावर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवतांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याबद्दल जालना पोलिसांनी उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचात काम करणारे अंबादास अंभोरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उस्मानी याने ट्विटरवर नुकत्याच झालेल्या काही पोस्टमध्ये भगवान राम यांच्याबद्दल अनादर शब्दांचा वापर केला. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
When was the last time you heard Jai Shree Ram, and what preceded it, call for humanity? No! Call for hatred and killing. They expect you to not call it what it is: a war cry to murder innocent, defenceless Muslims? We shall not!#JusticeForAsif
— Sharjeel Usmani (@SharjeelUsmani) May 17, 2021
या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी स्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम 295-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. हे प्रकरण जालना सायबर विभागात वर्ग करण्यात येणार आहे.
एल्गार परिषदेत हिंदुत्वावर टीका
याआधीही शरजील उस्मानी याने हिंदुत्वावर टीका केली आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात उस्मानीनं एल्गार परिषदेत हिंदुत्वावर टीका केली होती. एल्गार परिषदेत त्याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुण्यात स्वारगेट पोलिस ठाण्यात हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे उस्मानीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

