नांदेड : एक कायदा मागे घेतला तर सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील अशी शंका केंद्र सरकारच्या मनात आहे. त्यामुळे केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही असे केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. नांदेड येथील लोहा तालुक्यात शिवनी जामगा येथे ते बोलत होते. यावेळी केंद्र सरकार तडजोडीला तयार असल्याचे मतही त्यांनी मांडले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मागील ९० दिवसापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १२ बैठका घेतल्या. मात्र या बैठकीतून काहीच तोडगा निघाला नाही, यामुळे शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहे. असे रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्हीही आंदोलन केले पण कोणाला त्रास न देता आंदोलन केले. काही वेळा आम्ही दोन पावले मागे पण आलो आहोत. नांदेड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते
आंदोलनातील ९० टक्के शेतकरी पंजाब राज्यातील असल्याचे त्यांनी सांगितले. जर एखादा कायदा मागे घेतला तर आतापर्यंत पारीत केलेले सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील अशी शंका केंद्र सरकारला वाटत आहे. यामुळे कायदे मागे घेणे शक्य नाही, मात्र केंद्र सरकार हे तडजोडीला तयार आहे. असे केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
- संत नामदेवांच्या जयंतीचा उल्लेख परिपत्रकात करा; वर्षा गायकवाड, राजीव सातव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंध कडक करा; अर्जुन खोतकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- गोध्रा निवडणुकीत एमआयएमचा विक्रमी विजय, गुजरातमध्ये वाढली पक्षाची ताकद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
