Share

गरज भासल्यास आशिष शेलार यांना अटक करा – रुपाली चाकणकर

Published On: 

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यूप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी शेलार यांच्यावर IPC कलन ३५४ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे शेलार यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेलार यांच्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. जबाबदार लोकप्रतिनिधींनी महिलांच्या संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल रुपाली चाकणकर यांनी मागितला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांना महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल बोलताना शेलार यांनी अत्यंत बेताल वक्तव्य केल्याचे समाजमाध्यमातून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार गरज भासल्यास आशिष शेलार यांना अटक करण्यात यावी, असे निर्देशही रुपाली चाकणकर यांनी दिले असल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!