मुंबई : कॉमेडियन भारती सिंहने (Comedian Bharti Singh) मनोरंजन विश्वात मोठं यश कमावलं आहे. भारती सिंह २०१७ मध्ये लेखक हर्ष लिंबाचियासोबत ( writer Harsh Limbachia ) विवाह केला. आता भारती सिंह लवकरच आई होणार असल्याचे बोललं जात आहे. २०२२ मध्ये हर्ष आणि भारतीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मात्र याबद्दल नुकताच तिने खुलासा केला.
एका माहितीनुसार, भारती आणि हर्षच्या जवळील एका व्यक्तीने भारती प्रेग्नंट असल्याचे सांगितले आहे. ‘भारती ही प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ती सध्या विश्रांती घेत आहे. यामुळेच तिने कॉमेडी शोसह इतर सर्व काम थांबवली आहेत. ती हल्ली जास्त वेळ घरातच घालवते. ती घराबाहेर पडणे टाळते,’ असे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. याबाबत ती म्हणाली, गेल्या कित्येक दिवसांपासून मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र मी माझ्या प्रेग्नंसीबद्दल काहीही लपवणार किंवा नाकारणार नाही. पण जेव्हा त्याबाबत योग्य वेळ येईल, तेव्हा मी उघडपणे बोलेन असे स्पष्ट केले आहे. अशा गोष्टी कोणीही लपवू शकत नाही. त्यामुळे जेव्हा मला याबाबत सांगायचे असेल तेव्हा मी ते नक्की सांगेन.
https://www.instagram.com/p/CW_bg1OhkAx/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान सध्या भारती सिंह ही सुट्टीवर असली तरी लवकरच ती पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. ती लवकरच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये सहभागी होईल, असे बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या भारती ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना पाहायला मिळते. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलारांवर कारवाई सुडबुद्धीने- प्रविण दरेकर
- ‘आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीबाबत केले मोठे वक्तव्य
- ‘सर्वांनी दूसरा डोस घ्या अन्यथा…’; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे मोठे विधान
- एक जागा तीन दावेदार…कोण असणार एकदिवसीय संघाचा उपकर्णधार?

