Share

महावितरणवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार; भाजप आ. प्रशांत बंब यांचा इशारा!

Published On: 

औरंगाबाद:महावितरणकडून गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब (Prashant bumb) यांनी महावितरणला पत्र लिहून कुठलीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांची वीज कापल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला आहे. महावितरणवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

शासनाकडून महावितरणला शेकडो कोटी रुपयांचे अनुदान हे खास शेतकऱ्यांसाठी दिले जाते. मात्र एवढे अनुदान देऊनही शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संतापलेल्या प्रशांत बंब (Prashant bumb) यांनी महावितरणला तीन पाणी पत्र लिहून उत्तर मागितले आहे. बंब यांनी महावितरण कंपनीकडे राज्य सरकार सोबत झालेले सगळे करार त्याचबरोबर न्यायालय मधून आलेले अनेक आदेश आणि वेळोवेळी संघटना तसेच झालेल्या चर्चांचे सर्व पत्र कागदपत्रे आणि अहवाल देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी महावितरणला दिला आहे. गंगापूर तालुक्यात विद्युत रोहित्र बंद करणे या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करणे, अशा स्वरूपाच्या कारवाई महावितरणकडून सुरू आहेत. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा सुद्धा घेतलेला आहे. तत्पूर्वी कायदेशीर बाब म्हणून आमदार प्रशांत बंब (Prashant bumb) यांनी महावितरणला हे पत्र पाठवले. या पत्रानंतर महावितरणने जर का समाधानकारक भूमिका नाही घेतली तर कदाचित गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!