मुंबई – भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
मंडल आयोग आल्यानंतर भाजप त्याला विरोध करत होती ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, कुठल्या पध्दतीने ओबीसी आरक्षण देता येईल याबाबतीत कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करुन पुढे जाऊ अशी माहिती देखील नवाब मलिक यांनी दिली आहे.या राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला सुरुवात करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले होते आणि फेरनिर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते याची आठवणही नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीमकोर्टाने राज्यसरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका नाकारली आहे. मात्र या राज्यात महाविकास आघाडी सरकार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ओबीसी घटकांचा इतर आरक्षणासोबत राजकीय आरक्षण राहिले पाहिजे या मताशी सहमत आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने आयोग स्थापन करुन ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असे स्पष्ट केले आहे. शिवाय देशातील ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आलेली आहे. जर ही जनगणना झाली तर देशात, राज्यात आणि जिल्हानिहाय किती संख्या आहे याची माहिती मिळू शकते आणि पुढचा निर्णय घेता येऊ शकतो. मात्र आता सर्व कायदेशीर बाबी तपासून उचित निर्णय राज्य सरकार घेईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही, त्यात तिसरी लाट आली तर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

