Share

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तरुणीचा न्यूड व्हिडीओ कॉल, म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ शहराच्या वादग्रस्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या आज एका भलत्याच अडचणीत सापडल्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना आज एका तरुणीने न्यूड विडिओ कॉल केला. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कॉल उचलल्यावर या मुलीने अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. समोरील मुलीने विवस्त्र होण्याचा प्रयत्न करताच साध्वी यांनी लगेच विडिओ कॉल बंद केला. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी रात्री एका तरुणीचा विडिओ कॉल आला होता. ज्या क्रमांकावरून तरुणीने विडिओ कॉल केला होता त्याच क्रमांकावरून  साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अश्लील छायाचित्रे आणि अश्लील विडिओ पण पाठवण्यात आले होते.

या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या दोन्ही फोन नंबरविरोधात एफआयआर दाखल करत तपास सुरु केला आहे. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळ शहरातील टी-टी पोलीस स्थानकात रात्री दोन वाजता तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याबाबतीत तपस करायला सुरुवात केली आहे. याबाबतीत अधिक माहितीनुसार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी एका मुलीचा विडिओ कॉल आला होता.

तो विडिओ कॉल त्यांनी उचलताच समोरच्या मुलीने अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली. त्यामुलीचे हे कृत्य पाहून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लगेच विडिओ कॉल ठेवला. नंतर वेगळ्याच नंबर वरून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यात आला, विडिओ कॉलचा स्क्रीनशॉट  व अजून अश्लील विडिओ आणि अश्लील फोटो टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. आपण सांगितलेले काम केले नाही तर मी हे सगळे फोटो, स्क्रीनशॉट आणि विडिओ व्हायरल करिन. यासंबंधी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळ शहरातील टी-टी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

       महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!