जळगाव : काल(६ फेब्रु.)जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असतांना रक्षा यांनी राज्यभरात घडणाऱ्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची दादागिरी मुळीच खपवून घेणार नाही, असेही रक्षा म्हणाल्या.
यावेळी बोलत असतांना रक्षा खडसे म्हणाल्या की,‘सध्या महाराष्ट्रात चुकीचे राजकारण सुरू असून एखाद्या आरटीआय कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराची माहिती काढणे हा अधिकार आहे. परंतु, भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुण्यामध्ये ज्याप्रकारे खाली पाडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला हे चुकीचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्तेही राज्यात दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मुळीच खपवून घेतले जाणार नाही’, असेही रक्षा म्हणाल्या.
दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजप नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बापलेकीचं आपुलकीचं नातं… सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हाताने घातले शरद पवारांच्या पायात बूट
“लता मंगेशकर यांच्या निधनाने गंगा-यमुनेचा प्रवाह थांबला, हिमालयही दुःखाने वितळून गेला”
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर
‘तुझी हिम्मत कशी झाली…’; जेव्हा लतादीदींसाठी बाळासाहेबांनी गुलशन कुमार यांना झापलं होतं
पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू पण लता मंगेशकर यांच्या निधनाने व्यथित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

