Share

‘आता आपणच शासनाला मार्गदर्शन करावे’; प्रकाश मेहतांनी केली फडणवीसांना विनंती

Published On: 

मुंबई: देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातच महाराष्ट्रामध्ये कोरोनाची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाकडून खबरदारी म्हणून राज्यातील काही भागामध्ये लॉकडाऊन करण्यात आले, तर काही ठिकाणी कडक नियम लागू करण्यात आले. तर इतर काही भागामध्ये देखील लॉकडाऊन लागण्याचे चिन्ह दिसून येत आहे. यातच माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी ट्विटर आणि फेसबुकद्वारे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करावे’, असे सांगितले आहे.

आपल्या ट्विट आणि फेसबुक पोस्टमध्ये मेहता यांनी म्हटले आहे, की ‘माननीय देवेंद्र फडणवीसजी, सप्रेम नमस्कार, कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपरमध्ये आज सर्वाधिक ३२७ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय, असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आढळून येत आहेत. पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.’ अश्या पद्धतीने मेहता यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/bjpprakashmehta/posts/3705000152937446

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. ‘राज्यात आज 35952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2283037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 262685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे.’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!