Share

आयपीएलच्या धर्तीवर आता इमिरेट्स टी-ट्वेन्टीचा लीगचा थरार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

संपूर्ण क्रिकेट जगतात आयपीएल स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर आहे. आयपीएल खेळणं आता अनेक क्रिकेटपटूंचं स्वप्न बनलं आहे. अशातच आयपीएलच्या धर्तीवर इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आता आपली स्वत:ची टी-ट्वेन्टी सुरु करण्याची घोषणा केली आहे.

इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने संभावित टी-ट्वेन्टी लीग यूएईमध्ये होणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच या स्पर्धेत क्रिकेट जगतातले दिग्गज खेळाडू सहभागी होतील, अशी आशा इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने व्यक्त केलीय. जसं भारतातल्या क्रिकेट रसिकांवर आयपीएलचं गारुड आहे तसं यूएईमधल्या क्रीडा रसिकांनाही टी-ट्वेन्टी क्रिकेट खूप आवडतं. यूईएमधल्या ग्राऊंडवर एखादी टी-ट्वेन्टी मॅच असली की तिथले स्थानिक प्रेक्षक मॅचसाठी तुफान गर्दी करतात.

इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की टी -20 लीगचा पहिला हंगाम यावर्षी होणार आहे. लीगचे आयोजन डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत केले जाईल. या लीगला इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नहयान मुबारक अल नहयान यांचंही समर्थन आहे. यूएईने याअगोदरही स्थानिक पातळीवर टी-20 क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं आहे.

या स्पर्धेत क्रिकेट जगतातले अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेत सहा टीम खेळतील. या सहा टीमच्या फ्रेंजायजीबद्दल तसंच या पुढची माहिती लवकरात लवकर जाहीर करु, असं इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!