Share

‘जुन्या मित्रांसाठी मोदी दोन अश्रू ढाळतील काय ?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: प्रजसत्ताक दिनी शेतकरी आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचारामध्ये एका आंदोलकाचा ट्रैक्टर उलटल्याने मृत्यू झाला. मात्र काही मंडळींनी या घटनेची सत्यता न तपासता सोशल मिडीयावर बेजबाबदार पोस्ट केल्या. शशि थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, जफर आगा, परेश नाथ, अनंत नाथ,विनोद के जोस यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

दरम्यान, यासर्व मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने यासर्वांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. CJI एसए बोबडे, जस्टिस एएस बोपन्ना आणि जस्टिस वी रामासुब्रमण्यन यांच्या समोर हि सुनावणी झाली. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने या सर्वाना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून शिवसेनेकडून आज सरकारवर त्याचबरोबर पत्रकारांवर देखी टीका करण्यात आली आहे. तर नुकताच राज्यसभेतील खासदारांच्या निवृत्तीवर मोदी भावून झाले होते यावरून खासदार संजय राऊत यांनी मोदींना प्रश्न विचारला.

हिंदुस्थानातील पत्रकारिता इतकी हतबल व लाचार कधीच झाली नव्हती. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची आपली परंपरा आहे. ‘सत्यमेव जयते’ हे आपले बिरुद आहे, पण निवडणूक प्रचारात थापा मारून लोक सत्तेवर येतात. असत्याचा रोज जय होतोय. मात्र एक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात मेला की अपघातात? यावर कोर्टमार्शल करून पत्रकारांना देशद्रोहाच्या वधस्तंभावर लटकविले जात आहे. पंतप्रधान मोदी हे कधीकाळी पत्रकारांचे मित्र होते. पत्रकारांनीच मोदींना शिखरावर नेले. आपल्या जुन्या मित्रांसाठी मोदी दोन अश्रू ढाळतील काय?’ असा घणाघात आजच्या सामना अग्रलेखातून सरकार वर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!