Share

टीम इंडियाला मोठा झटका, इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी रविंद्र जडेजा तंदुरुस्त नाही

Published On: 

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. भारताचा अष्ठपैलू फिरकी खेळाडू रविंद्र जडेजा या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. रविंद्र जडेजा हा या मालिकेत खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त नाही. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका वृत्ताने दिलेल्या माहिती नुसार फिटनेस नसल्याने टीम इंडियाला ही मालिका रविंद्र जडेजा याच्याशिवाय खेळावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट मालिकेच्या तीसऱ्या सामन्यात तिसऱ्या दिवशी जडेजा याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो सामना अर्धवट सोडून टेस्ट सामन्यातून माघार घेतली होती. दुखापतीनंतर त्याला बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अॅकेडीमीत पाठविण्यात आले होते.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1–0 अशी आघाडी मिळवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!