🕒 1 min read
नवी दिल्ली: विभक्त कुटुंब आणि बदलते कौटुंबिक समीकरणे यामध्ये वृद्ध माता पित्यांचा सांभाळ करायचा कोणी असा प्रश्न अनेक अपत्यांकडून उपस्थित केला जातो. तर जे वृद्ध निसंतान किंवा पुत्र नसणारे असतात त्यांच्या देखील निर्वाहाचे प्रश्न समाजात अनेक कुटुंबात बघायला मिळतात मात्र आता यावर उपाय करणारे एक विधेयक संसदेत मंजूर करण्यात येणार आहे.
८ मार्चपासून होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण (दुरुस्ती) विधेयक २०१९ शी संबंधित विधेयक मांडले जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक असलेल्या घरातील व्यक्तींना मुला-मुलींसह सून-जावयांनाही निर्वाह भत्ता द्यावा लागणार आहे. संसदेच्या स्थायी समितीने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकामध्ये ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.
या विधेयकामध्ये अपत्यांसोबतच संपत्तीमध्ये हक्कदार असलेले अन्य दत्तक मुले, मुली, जावई, सून आणि सावत्र मुले तसेच नातेवाईक हे सुद्धा अपत्यांच्या श्रेणीत येणार आहेत. त्यामुळे त्यांना अशा घरातील ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता देणे बंधनकारक असेल. तसेच हा कायदा अमलात आल्यानंतर आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांची काळजी न घेतल्यास किंवा त्यांच्या मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्यास ते महागात पडणार आहे. समितीने सांगितले की, असा कुठलाही कायदेशीर उत्तराधिकारी संततीच्या चौकटीत येणार ज्याचा मालमत्तेवर अधिकार असेल. जर संतती अल्पवयीन असेल तर त्याचा कायदेशीर पालकच वृद्धाचा नातेवाईक मानला जाईल. मात्र निर्वाह भत्त्याची रक्कम ही पालकांची गरज आणि अपत्याच्या उत्पन्नाच्या आधारावर निश्चित होणार आहे.
एका अंदाजानुसार देशभरात सध्या १२ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये ही संख्या वाढून १७ कोटी होणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार सरकारची प्राथमिकता असेल त्याचबरोबर पालकांना डिजिटल साक्षरतेशी जोडले जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या एकुलत्या अपत्याला विशेष सुट्टीचीही तरतूद असेल. वरिष्ठांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात असिस्टंट सब इन्स्पेक्टर किंवा त्यापेक्षा वरच्या रँकचा एक नोडल अधिकारी नियुक्त असेल आणि विशेष हेल्थकेअर अँड कौन्सिलिंग सेंटरसुद्धा स्थापित केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- इंधन दरवाढीत खरेदी करा 74 kmpl मायलेज देणारी बाईक
- प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही; मीम्स पाहून व्हाल वेडे !
- ‘पवार फक्त नाराज होणार पण राठोडांवर कारवाई नाही होऊ देणार’
- ठाकरे सरकारच्या प्रतिमेची शरद पवारांना वाटत असेलेली काळजी हा फक्त दिखावा ?
- ‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
