🕒 1 min read
मुंबई : सध्या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या काळात नागरिक त्रस्त झाले आहेत यासाठी बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. अशाच कमी किंमत आणि जास्त मायलेज देणाऱ्या एका बाईकची माहिती आज आपण जाणून घेऊ
टीव्हीएस स्पोर्ट ही अशी बाईक आहे जी दररोजच्या प्रवासामध्ये ऑफिसला/कॉलेजला जाण्यासाठी किंवा दररोज बराच वेळ प्रवास करत असाल तर त्याला एक अशी बाईक हवी असते जी उत्कृष्ट मायलेज देईल, सोबतच त्या वाहनाची किंमत देखील कमी असेल. किफायतशीर किंमतीत अधिक मायलेज देणाऱ्या बाईक्स हल्ली प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची गरज बनली आहे.
टीव्हीएस स्पोर्टची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या बाईकबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, ही बाईक 74 किलोमीटर प्रतिलिटर इतकं मायलेज देते. या बाईकचं टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतकं आहे. या बाईकमध्ये तुम्हाला 99.7 सीसी चं 4 स्ट्रोक सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे, जे फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानासह काम करतं.
या बाईकचं इंजिन 7350 आरपीएम वर 8.1 बीएचपी इतकी मॅक्सिमम उर्जा आणि 4500 आरपीएम वर 8.7 Nm एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. टीव्हीएस स्पोर्टचे (TVS Sport) इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकची लांबी 1950 मिलिमीटर, रुंदी 705 मिलीमीटर आणि उंची 1080 मिलीमीटर इतकी आहे तर व्हीलबेस 1236 मिलीमीटर आणि ग्राउंड क्लीयरन्स 175 मिलीमीटर इतका आहे. टीव्हीएस स्पोर्टच्या पुढच्या बाजूला 130 मिमी ड्रम ब्रेक आहे. तर मागील बाजूस 110 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी मागीला बाजूस CBS फीचर देण्यात आले आहे. 10 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक ऑईल डॅम्ड सस्पेंशन देण्यात आलं आहे. त्याच वेळी, बाईकच्या मागील बाजूस 5-स्टेप एडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन देण्यात आलं आहे. टीव्हीएस स्पोर्टच्या किक स्टार्ट अलॉय व्हील व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 56,100 रुपये आहे. तर या बाईकच्या सेल्फ-स्टार्ट अ;ॅलोय व्हील व्हेरिएंटची किंमत 62,950 रुपये इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमचेच दात आणि तुमचेच ओठ… पवार साहेब फक्त नाराज होणार पण कारवाई नाही होऊ देणार’
- प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही; मीम्स पाहून व्हाल वेडे !
- ‘पवार फक्त नाराज होणार पण राठोडांवर कारवाई नाही होऊ देणार’
- ठाकरे सरकारच्या प्रतिमेची शरद पवारांना वाटत असेलेली काळजी हा फक्त दिखावा ?
- ‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
