🕒 1 min read
नागपूर : वनमंत्री संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. ‘पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावरून कारवाई झाली नाही. किमान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरी राठोड यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी विरोधकांनी केली होती.
पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचं पालन केलं जाईल’, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
दरम्यान, उपस्थितांवर कारवाई करण्यापेक्षा ज्यांच्यामुळे हा जमाव जमला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने केली आहे. माजी मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे. ‘संजय राठोड यांनी पोहरादेवी इथं जे ओंगळवाणं शक्तीप्रदर्शन केलं ते लाज आणणारं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आवाहन धुडकावून लावत गर्दी जमवली. अशी गर्दी जमवून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय. मुख्यमंत्री महोदय कार्यकर्त्यांवर नाही तर राठोडांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या,’ अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली भूषणसिंह राजे होळकरांनी मागणी
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- जगातील सर्वात मोठे स्टेडियम आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार
- ‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’
- ‘विराट कोहली कोणतं काम करु शकत नाही?’, ICC ने शेअर केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
