🕒 1 min read
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर आयकर विभागाने जरंडेश्वर साखर कारखान्यावर छापा मारला. याबाबत अजित पवार आज मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात एक रीतसर पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगणार असल्याचं म्हणाले आहेत.
जरंडेश्वर साखर कारखान्याची केस ईडीकडेअसून कोर्टात सुरु आहे. या संदर्भात भाजपच्या काळात सीआयडी चौकशी झाली. एसीबीचीही चौकशी झाली. सहकार विभागाकडून एका रिटायर न्यायाधिशामार्फत चौकशी केली. महाराष्ट्रात एकटा जरंडेश्वर कारखाना विकला गेला नाही. माझ्याकडे सगळी कादपत्रे रेकॉर्ड आहेत. पण मला ते तुम्हाला सांगणार नाही. याबाबत मी स्वतंत्र रीतसर एक पत्रकार परिषद घेणार आहे. आज मुंबईत घेऊ शकतो किंवा मग उद्या पुण्यात घेईल, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात सुरवातीपासून किती कारखाने विकले? कोणाच्या कारकिर्दीमध्ये विकले गेले? काय किमतीला विकले गेले? काही कारखाने 3 कोटी, साडे 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, काही 12 कोटी असे विकले गेले. कारखाने विकताना त्या सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते. त्यांनी निर्णय घेतले. काही वेळेस जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज थकलं म्हणून विकले गेले. काही वेळेस न्यायालयाच्या डायरेक्शन दिल्या गेल्या म्हणून विकले गेले, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
तुम्ही लोक अलिकडे पत्रकार झाला असाल पण मी 1990 पासून समाजकारणात, राजकारणात आहे, उभा महाराष्ट्र मला ओळखतो की, मी बेईमान आहे की शब्दाला पक्का आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक चौकशीचा सामना करावा लागत आहे. माध्यमांशी बोलताना याबाबत आपली भूमिका अजितदादांनी मांडली व या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी रीतसर एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. pic.twitter.com/xZYAZHCTgE
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 21, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- …पण काही जण एवढी कागदपत्रं दाखवतात की जणू हेच चौकशी करणार आहेत- अजित पवार
- ‘महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर भाजप पेट्रोल ओतून आग लावतात’
- जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल – अजित पवार
- ‘मेळावे घेणे, चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडं रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?’
- तुमच्याकडे तपास यंत्रणा, शोधू शकता; मनिषा कायंदेंचं अमृता फडणवीसांना उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
