मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर आणखी एक मोठा आरोप केला आहे. मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून एनसीबीच्या वसुलीबद्दल ते बोलले आहेत. मलिकच्या आरोपावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे.
नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मालिकांवर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करतील, असं एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत.
कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही तिकडे उपस्थित होते. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, मालदीवमधील फोटो शेअर करून समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्य तिथे उपस्थित होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अजून एक वळण लागण्याची शक्यता आहे. मात्र नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बहिणीवर केलेल्या आरोपांना मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उभा महाराष्ट्र मला ओळखतो की, मी बेईमान आहे की शब्दाला पक्का आहे’
- …पण काही जण एवढी कागदपत्रं दाखवतात की जणू हेच चौकशी करणार आहेत- अजित पवार
- ‘महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर भाजप पेट्रोल ओतून आग लावतात’
- जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल – अजित पवार
- ‘मेळावे घेणे, चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडं रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?’


