Share

उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही म्हणून…; चित्रा वाघ यांची राऊतांवर बोचरी टीका

Published On: 

औरंगाबाद : बीडकीनपासून काही अंतरावर असलेल्या तोंडोळी शिवारातील शेतमजुराच्या वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी मजुरांच्या घरात घुसून शस्त्राने पुरूषांना अमानुष मारहाण केली. 2 महिलांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी पोलिसांनी रूग्णालयात हलवले असून आरोपीच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.

दरोडा व अत्याचाराच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी, राज्य सरकारवर निशाणा साधला. चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार आहेत, त्यामुळे याप्रकरणातील आरोप कधी सापडतील हाही प्रश्न आहे, पोलिसांना यश यावो, हे आरोपी लवकरात लवकर सापडो’, अशी अपेक्षा वाघ यांनी व्यक्त केली.

१५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचा-यांच्या रक्षणासाठी परजतेय…
कदाचित. उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल.., अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केली आहे.

राज्यात मोघलाई, निजामशाही अवतरल्याची भावना सगळ्यांची आहे, वेगवेगळ्या विषय़ांवर ज्ञान झाडणारे सर्वज्ञानी, यांना उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरल्याचं दिसत नाही. कारण, त्यांच्यापर्यंत अजून ही औरंगाबादची घटना पोहोचलेली दिसत नाही. प्रत्येकवेळेला, ज्यावेळी आम्ही महिलांवरील अत्याचारावर बोलतो, त्यावर विरोधकांचे थोबाड फोडा, असे म्हणणारे सर्वज्ञानी यावर अजून का बोलले नाहीत, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!