🕒 1 min read
रत्नागिरी : शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.
अशातच, औरंगाबादमध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा फलक शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. या फलकामुळे चर्चांना नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. तर, याआधी खासदार देखील शिवसेनेचेचं होते. राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेकडे आहे. आता, शिवसेनेने यासंदर्भात हालचाली सुरु केल्याचं दिसून येत आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आहे.
या संदर्भात काँग्रेसची असलेली भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. काँग्रेसला नामकरण मान्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. ‘या प्रस्तावाबद्दल मला माहिती नाही. महाविकास आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर करण्यात आली आहे. सामान्य माणसाला केंद्रीभूत करून सरावानं सोबत घ्यायचं, त्यांना सुखी करायचं हा आमचा किमान सामान कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.’ असं ते म्हणाले.
तर, ‘विकासावर आम्ही केंद्रित आहोत. नावं बदलणं हा विषय नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा अजेंडा म्हणून नामकरण आम्हाला मान्य नाही. काँग्रेस विकासाची वाटचाल करणारी आहे. नाव बदलावर आमचा विश्वास नाही. नाव बदलून काही होत नाही. इतिहास बदलू शकत नाही.’ अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. यामुळे शिवसेना चांगलीच कोंडीत सापडण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या विरोधानंतर शिवसेना काय भूमिका घेणार? असा सवाल विरोधक करत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी! संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची?’ असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..
बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!
संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!
— Nitesh Rane (@NiteshNRane) December 31, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेब, आता तरी पीडित मुलीला न्याय देणार का?’
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- ‘…अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ऑफिस फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही’
- मी रात्री ११ वाजता तिच्या घरी पोहोचलो आणि राहिलो तर? युवकाच्या या प्रश्नाला मुंबई पोलिसांचं सडेतोड उत्तर
- खबरदार! शहराबाहेर जात असाल तर उद्या संचारबंदी संपल्यानंतरच परत या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
