🕒 1 min read
पुणे : राज्यात सद्या कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा घोळ कायम असतानाच आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार खुला प्रवर्गातील उमेदवारांना फक्त सहा वेळा तर ओबीसी (OBC) गटातून 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.
राज्य लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करून महत्वाची घोषणा केली आहे. लोकसेवा आयोगातर्फे विविध शासकीय पदांसाठी निवड प्रक्रियांमध्ये सुधारणात्मक उपाययोजनांपैकी स्पर्धा परिक्षांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न अथवा संधीची संख्या आता मर्यादित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संधी मानली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल. यासोबतच, उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाणार आहे. हा निर्णय 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या परीक्षांबाबतच्या जाहिरातींना लागू होईल.
दरम्यान, या निर्णयावर आता चौफेर टीका होत आहे. रयत क्रांती संघटनेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मुळावर येणारा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी मर्यादा घातलेला निर्णय म्हणजे स्पर्धेतून त्यांना बाद करण्याचा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिली.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी ६ वेळेस व इतर मागासवर्गीयांसाठी ९ वेळेस परीक्षा देण्याची मर्यादा घातली गेलेला आजचा निर्णय म्हणजे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा अन्याय करणारा आहे असे शिंदे म्हणाले. हा विद्यार्थ्यावर अन्यायकारक करणारा निर्णय तात्काळ मागे अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही असा इशारा पांडुरंग शिंदे यांनी दिला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) प्रमाणे निर्णय घेण्याचा जो अट्टहास चालू केलेला आहे, त्याआधी आपल्या कारभारात सुधारणा करावी व पारदर्शकता आणावी आणि वेळेवर परीक्षा घ्याव्यात, निकाल वेळेवर लावावे, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुका कमी कराव्यात व त्यानंतर आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची बरोबरी करावे असे पांडुरंग शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा समाजाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत,त्या शंका दूर करणे आवश्यक आहे’
- सरकारकडून गाडीमध्ये फास्टॅग लावण्याची डेडलाईन वाढवण्यात येऊ शकते
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- डिसेंबर अगोदरच भारतात आला असू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन – एम्स संचालक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
