Share

खबरदार! शहराबाहेर जात असाल तर उद्या संचारबंदी संपल्यानंतरच परत या…

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : २०२० हे वर्ष संपायला अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. हे सरतं वर्ष अनेक संकटांचं ठरलं असतानाच येणारे वर्ष अधिकाधिक चांगलं जावं अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. यंदा नववर्षाच्या निर्बंध आले असून नागरिकांनी सतर्कता बाळगून साधेपणाने सेलिब्रेशन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. रात्री ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी रात्री ११ नंतर घराबाहेर पडू नये असं आवाहन नाशिक शहर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर रात्री ११ च्या आधी शहराबाहेर जाणार असाल तर थेट उद्या सकाळीच परत या. विनाकारण रात्री भटकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील नाशिकच्या पोलिसांनी दिला आहे. शहरात एकूण ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी घरीच थांबावं, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!