🕒 1 min read
मुंबई : २०२० हे वर्ष संपायला अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. हे सरतं वर्ष अनेक संकटांचं ठरलं असतानाच येणारे वर्ष अधिकाधिक चांगलं जावं अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. यंदा नववर्षाच्या निर्बंध आले असून नागरिकांनी सतर्कता बाळगून साधेपणाने सेलिब्रेशन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. रात्री ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, ट्विटरवर नागरिकांच्या समस्यांना लगेच जाणून घेऊन भन्नाट उत्तर देणाऱ्या मुंबई पोलिसांना याच संदर्भात एका युवकाने प्रश्न केला. मग मुंबई पोलिसांनी देखील आपल्या ‘स्टाईल’ने या युवकास उत्तर दिलं. मुंबई पोलिसांनी एका प्रतिकात्मक संदेशाद्वारे ‘ऑनलाइन एकत्र या’ असं सांगितलं होतं. यावर, ‘जर मी तिच्या घरी ११ वाजता पोहोचलो आणि रात्रभर तिथंच राहिलो तर?’ असा प्रश्न या युवकाने केला.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1344485533876105217
मुंबई पोलिसांनी देखील लगेचच ‘तू तिची परवानगी घेतली असशील अशी आम्हाला अशा आहे, अन्यथा आमच्या डोक्यात तुझ्यासाठी राहण्याची एक पर्यायी व्यवस्था आहे’ असं सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्या युवकाची बोलतीच बंद केली. यासह त्यांनी #ConsentMatters #SafetyFirstOn31st असे हॅशटॅग देखील शेअर केले आहेत.
We hope you have taken her consent else we have an alternate accommodation for the night in mind for you! #ConsentMatters #SafetyFirstOn31st https://t.co/nKbdA64rOF
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) December 31, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेब, आता तरी पीडित मुलीला न्याय देणार का?’
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- ‘…अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ऑफिस फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही’
- जिओ ग्राहकांना खुशखबर ! उद्यापासून प्रत्येक नेटवर्कवर करता येणार फ्री कॉलिंग
- डिसेंबर अगोदरच भारतात आला असू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन – एम्स संचालक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
