मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.
अशातच, राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. EWS आरक्षण मराठा समाजाला दिल्यानंतर देखील मराठा समाजातील नेते यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील मराठा समाजाला EWS आरक्षणत समाविष्ट केल्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारला रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घ्या अन्यथा सर्व समाजाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
‘उशिरा का होईना मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना EWS आरक्षण राज्य सरकारने खुलं केलं. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. परंतु दुसरीकडे या राज्यामध्ये ७२ हजार पदांची मेगाभरती थांबवली आहे. यासोबत साडेबारा हजार पदांची पोलीस भरती, पाच हजार पदांची महावितरणमधील विद्युत सहाय्य्यकांची भरती अशा भरत्या थांबवलेल्या आहेत.’
‘यासोबतच एमपीएससी परीक्षा थांबवली आहे, गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा या जूनमध्ये निकाल लागला आहे. जवळपास ४१३ पदं असून त्यात मराठा समाजाच्या देखील ४८ पदं आहेत. बाकीचे ३६५ पदं जी आहेत ते SC, ST, धनगर आणि ओबीसी समाजाचे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये डीवायएसपी, आरटीओ, कलेक्टर, तहसीलदार अशी महत्वाची पदं असून या नियुक्त्या का थांबवल्या आहेत?’ असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
‘या भरत्या ताबडतोब घ्याव्यात अन्यथा या भरत्या नाही घेतला, एमपीएससी परीक्षांचे आदेश नाही काढले तर आम्हाला SC, ST संघटनांना सोबत घेऊन धनगर, ओबीसी यांच्यासह मोठं आंदोलन आम्ही महाराष्ट्रात उभं करू त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार असेल,’ असा निर्वाणीचा इशारा देखील शेंडगे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विरोधक कृषी कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत’
- काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार, मात्र…
- मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, शोधला दुर्मिळ चन्ना स्नेकहेड
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- सुडाचे राजकारण करणाऱ्यांना अक्कल येवो ही अटलजींच्या जयंतीदिनी प्रार्थना – मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

