Share

काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार, मात्र…

Published On: 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ता तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद पाठोपाठ आता मुंबई महापालिकांमध्ये देखील काँग्रेस स्वबळाने लढण्यास उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.  मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात अशी गर्जनाचं केली. यानंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे.

आज भाई जगताप यांच्यासह मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. ‘ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून मित्रपक्षांच्या नेत्यांच्या देखील भेटी कालपर्यंत घेतल्या असून आजपासून कमला सुरुवात केली आहे. मुंबईतील २२७ जागांवर लढण्याची तयारी सुरु आहे म्हणजेच स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. मात्र, राज्यात महाविकस आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे हायकमांडचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.’ असा खुलासा देखील जगतापांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!