मुंबई : आज भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींची आज ९६ वी जयंती आहे. या निमित्त अटलजींना सर्व स्तरातून आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वाजपेयींना आदरांजली वाहतानाच भाजप नेत्यांना टोमणा मारला आहे.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अटलबिहारी वाजपेयी यांचा एक किस्सा देखील सांगितला आहे. ‘प्रधानमंत्री पदावर असताना गुजरात भुकंपाची परिस्थिती हाताळायला पवार साहेबाचे मार्गदर्शन घेऊन कार्य करणारे दिवंगत प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. प्रगतीचे राजकारण करणाऱ्या अटलजींना जयंतीदिनी अभिवादन. सुडाचे राजकारण करणाऱ्यांना अक्कल येवो ही जयंतीदिनी प्रार्थना’ असा टोला मिटकरींनी भाजप नेत्यांना लगावला आहे. त्यांनी ट्विटसोबतच विधान परिषदेत वाजपेयींच्या कविता म्हणतानाच व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
प्रधानमंत्री पदावर असताना गुजरात भुकंपाची परिस्थिती हाताळायला पवार साहेबाचे मार्गदर्शन घेऊन कार्य करणारे दिवंगत प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती.
प्रगतीचे राजकारण करणाऱ्या अटलजींना जयंतीदिनी अभिवादन.
सुडाचे राजकारण करणाऱ्यांना अक्कल येवो ही जयंतीदिनी प्रार्थना pic.twitter.com/6EwBFKZo4M— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 25, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वाजपेयींना नमन केलं आहे. ते म्हणाले, ‘माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या जन्म जयंतीवर शत-शत नमन. आपल्या दूरदर्शी नेतृत्वात त्यांनी देशाला विकासाच्या अभूतपूर्व उंचीवर पोहोचवले आहे. एक सशक्त आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी त्यांच्या प्रयत्नांना सातत्याने उजाळा दिला जाईल.’
महत्वाच्या बातम्या
- ‘विरोधक कृषी कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत’
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, शोधला दुर्मिळ चन्ना स्नेकहेड
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- कोरेगाव भीमा: जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबरपासून 4 दिवस संचारबंदी


