मुंबई : आज (दि. १८ मार्च) रोजी जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली आहे. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, जळगाव महापालिकेवर शिवसेनेनं झेंडा फडकावला असून गेल्या आठवड्याभरात मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं.
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली आहेत. बहुमतासाठी ३८ मतांची गरज शिवसेनेला होती. त्यामुळे अवघे १५ नगरसेवक असूनही तिप्पट बलाढ्य भाजपला शिवसेनेनं आपल्या बाणाने घायाळ केलं आहे.
शिवसेनेच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा ‘टप्प्यात कार्यक्रम’ करत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर केला, आता जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला आहे. आता राज्यात आणि स्थानिक संस्थांमध्ये देखील फक्त महाविकास आघाडीचं सरकार ! तर, भाजपच्या ओहोटीला सुरुवात,’ असं भाष्य तपासे यांनी केलं आहे.
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री ना. @Jayant_R_Patil यांनी भाजपाचा 'टप्प्यात कार्यक्रम' करत @NCPspeaks चा महापौर केला, आता जळगावात आज @ShivSena ने भगवा फडकवला असून @BJP4Maharashtra चा उधळलेला वारु आता ओहोटीच्या रुपात दिसू लागला आहे.#महाविकासआघाडी
— महेश तपासे Maehesh Tapasey (@maheshtapase) March 18, 2021
महत्वाच्या बातम्या
- मोटू-पतलूच्या हातात कोंबड्या देऊन युवासेनेचे राणेंच्या विरोधात आंदोलन !
- महाजनांना धक्का : भाजपचे तब्बल 27 फुटल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- भारताचा गोलंदाजपटू राहुल शर्माच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन
- येत्या वर्षभरात हटवण्यात येणार सर्व टोलनाके; नितीन गडकरींची मोठी घोषणा


