Share

मोटू-पतलूच्या हातात कोंबड्या देऊन युवासेनेचे राणेंच्या विरोधात आंदोलन !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेना नेते वरुण सरदेसाई आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर हा वाद चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन शिवसेना युवा सेना आणि भाजपात निर्माण झालेला वाद आता चिघळला आहे. पुणे जिल्हा युवा सेनेच्यावतीने वाघोली येथे मोटू-पतलू कार्टूनच्या हातात कोबंड्या पकडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख मच्छिंद्र सातव यांच्या सह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नितेश राणे यांनी वरुण सरदेसाईंवर सचिन वाझे प्रकरणात नाव घेऊन गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे आयपीएल सुरु झाल्यानंतर सट्टेबाजांना धमकी देऊन १५० कोटींची खंडणी मागितली होती. दरम्यान, नितेश राणेंच्या आरोपांना वरुण सरदेसाईंचे सणसणीत प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान या आरोप प्रत्यारोपारवरुन शिवसेना युवा सेना आणि भाजपात वाद चिघळला आहे. पुणे जिल्हा युवा सेनेच्यावतीने वाघोलीत नितेश राणे आणि नारायणा राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

याआधी,नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला होता. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला होता.

नितेश राणे यांनी कोणते आरोप केले होते ?

‘देशात आयपीएलचं आयोजन देशातील नवोदित खेळाडूंना वाव मिळावं यासाठी करण्यात येतं. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजी करणाऱ्यांचं लोकेशन व इतर माहिती असल्याचं सांगत छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या,’ अशी मागणी वाझे करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.

‘वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत.’ असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.

पुढे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी,’ असं आहेत. तसेच, ‘सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

यावरून वरून सरदेसाई यांनी राणे घराण्यावर खोचक टीका केली होती. ‘राणेंच्या घराची पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना माहितच आहे. ते काँग्रेसमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंवर गंभीर आरोप केले होते. धमकावणे, मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत,’ असं टीकास्त्र सरदेसाई यांनी सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!