Share

येत्या वर्षभरात हटवण्यात येणार सर्व टोलनाके; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : टोलनाक्यांच्या संदर्भात लोकसभेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्व टोलनाके येत्या वर्षभरात हटवण्यात येतील तसेच टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर नजीक रस्त्यावर नगरपालिकेच्या सीमेत टोलनाके असल्याचा मुद्दा संसदेत उचलला होता. यावर उत्तर देताना गडकरी यांनी FASTag लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार असून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. जीपीएस प्रणालीमुळे टोल थेट बँक खात्यातून वजा होणार आहे. वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल करण्यात येईल. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात येईल.

टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!