🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने घातलेल्या संसर्गामुळे शिक्षणक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा, महाविद्यालये पूर्णतः नियमितपणे सुरु करण्यात आलेले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या आधारावर दहावी व बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.
यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने दहावीच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
तर, बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला असून शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
त्यामुळे यावर्षी बारावीची मुले गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्याच्या शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad जी, आपणास विनंती आहे की कृपया संबंधित घटकांशी चर्चा करुन याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा. @CMOMaharashtra
— Supriya Sule (@supriya_sule) April 21, 2021
‘कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षांबाबत मुले, पालक व शिक्षकांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था आहे. मुलांना वर्षभर शाळेत जाता आले नाही.याशिवाय सर्वच मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता आले याबाबतही काही ठोस सांगता येत नाही. त्यामुळे यावर्षी बारावीची मुले गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड जी, आपणास विनंती आहे की कृपया संबंधित घटकांशी चर्चा करुन याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नगरला येणारा ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, वेगळ्या भाषेचा उपयोग केल्यानंतर सोडला – थोरात
- ४५ वर्षांनी देशाचा गरीब श्रेणीत पुन्हा समावेश, मोदींनी करून दाखवलं; काँग्रेसची टीका
- पुण्याचे नाशिक होऊ देऊ नका; महापौर मोहळांची सरकारला विनवणी
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी नसेल पण…; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
