🕒 1 min read
पुणे : नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती. यामुळे सुमारे दीड ते दोन तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे १२० हुन अधिक गंभीर रुग्ण हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वर अवलंबून होते.
ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अक्षरशः श्वास घेता न आल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीला नातेवाईक धावून जात त्यांच्या छातीवर दाब टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ऑक्सिजन अभावी रुग्णांनी प्राण सोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे व गंभीर असल्याने देशाच्या पंतप्रधानांपासून ते इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत.
तसेच आता पुणे शहरात रेमडेसिविर चा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनेक खासगी व सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांची भरती थांबवण्याची वेळ आली आहे. हे चित्र आजच्या भयाण परिस्थितीत नक्कीच चांगले नाही. त्यामुळे ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर यांच्या पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असेल ती त्यांनी पूर्ण क्षमतेने उभी करावी. या संबंधीची भावना आम्ही राज्य सरकारकडे केली आहे राज्य सरकारने पुण्याचे नाशिक होऊ देऊ नये असेही आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज केली आहे.
पुण्यातील ऑक्सिजन व रेमडेसिविरच्या समस्येवर आज विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यात लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेल्या परिस्थितवर मार्ग निघेल अशी आशा आहे. पुणे शहरात खासगी व सरकारी हॉस्पिटल मिळून साधारण २५० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज पुण्याला लागतो. मात्र गेल्या ३ ते ४ दिवसांपासून त्यात कमतरता निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक रुग्णालयातील गंभीर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले. तसेच काही ठिकाणी भरती थांबवावी लागली. पण आता पुरेसा साठा ऑक्सिजनचा निर्माण झाल्याशिवाय ऑक्सिजन बेड सुरू करणे शक्य नाही. ही परिस्थिती वाईट आहे. असे ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नगरला येणारा ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, वेगळ्या भाषेचा उपयोग केल्यानंतर सोडला – थोरात
- ४५ वर्षांनी देशाचा गरीब श्रेणीत पुन्हा समावेश, मोदींनी करून दाखवलं; काँग्रेसची टीका
- कोरोनाच्या लढ्यात भाजपकडून राजकारणाला महत्त्व-प्रकाश आंबेडकर
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी नसेल पण…; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
