मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या चाकाला लटकलेल्या लोकांपैकी काही जण खाली पडून मृत्यूमुखी पडले. एकूणच अशा भयावह स्थितीमध्ये अफगाणिस्तानात विविध देशांमधील अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी गेलेले नागरिक हे सुरक्षित स्थळी परतण्यासाठी धडपड करत आहेत.
जगभरातून अफगाणिस्तानच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली जात असतानाच आता भाजप नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राला अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. ‘महाराष्ट्राला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे sleeper cells आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तातडीने आणि गंभीरतेने हा विषय हाताळावा, नंतर सांगतील केंद्राने कळवलं नाही,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
महाराष्ट्राला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे sleeper cells आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तातडीने आणि गंभीरतेने हा विषय हाताळावा, नंतर सांगतील केंद्राने कळवळं नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 17, 2021
शाब्बास भारतीय हवाई दल ! प्रतिकूल स्थितीतही भारतीयांना आणलं सुखरूप मायदेशी
अफगाणिस्तानात भारतीय नागरिकांची संख्या देखील अधिक असून भारतीय हवाई दलाने त्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यास आता सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातच्या जामनगर विमानतळावर हे विमान उतरले. यानंतर नागरिकांनी भारत माता की जयच्या घोषणा देत हवाई दलाचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या
- लसींचा मुबलक पुरवठा करण्यासाठी सीरमने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदीर उघडण्यासाठी पुजाऱ्यांसह व्यापारी आक्रमक
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

