Share

‘आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार’ मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा संताप

Published On: 

सातारा: मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता आक्रमकता दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाबाबत विविध मुद्दे मांडण्यात आले. विरोधकांनी देखील अनेकवेळा राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार अशा कठोर शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे यांनी राज्यातील विविध नेत्यांच्या भेटी घेत आरक्षणाबाबत भूमिका मांडली. मात्र या भेटीविषयी बोलताना त्यांनी या भेटीचा काही उपयोग झाला नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारचे प्रतिनिधी न्यायलयात हजर होत नाहीत. राज्य सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळायला पाहिजे. आम्ही सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केले नाही, म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा सामाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे. तसेच मराठा आरक्षणावर कोणी नेतृत्व करायचे म्हटले की, उदयनराजे यांचे नाव समोर येते. तुम्हाला वाटते का, यातून आरक्षण प्रश्नावर मार्ग निघेल, असा प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!