Share

सचिन वाझेंची अखेर बदली झाली; आता ‘या’ विभागात पदभार स्वीकारणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांची आता कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान, आता यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले आहे. यानुसार सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान,मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे चांगलेच अडचणीत आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरेन यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान,मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या स्टेटमेंटमध्ये एपीआय सचिन वाझे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र एटीएसचे अधिकाऱ्यांकडून त्यांची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता असताना आता वाझेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानंतर (एटीएस) आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!