Share

‘इंतेहा हो गई इंतजार की’ कोटेशन भरुन ७ वर्षानंतरही नाही मिळाली वीज जो़डणी

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्याबाबत नवीन सांगायची गरज नाही. पण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी स्वतः आपले भोंगळ कारभाराचे रेकॉर्ड तोडण्याच्या प्रयत्नात असते. असाच एक भोंगळ कारभाराचा नवीन कीर्तिमान आपल्या विद्युत कंपनीने प्रस्तापित केला आहे. तब्बल सात वर्षांअगोदर वीज जोडणीसाठी कोटेशन भरल्या नंतर सुद्धा अजूनही कनेक्शन दिल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

कंधार तालुक्यातील जंगमवाडी येथील रहिवासी असलेले अल्पभूधारक शेतकरी पिराजी नागोराव झंपलवाड यांनी आपली शेती बागायती करावी या हेतूने तब्बल सात वर्षांपूर्वी म्हणजेच ता. २१ जुलै २०१४ रोजी संबंधित कार्यालयाकडे थ्रीफेज वीज जोडणीसाठी रीतसर कोटेशन पाच हजार ६२७ रुपये भरले असून त्याचे आर क्र.५६२७९ आहे तर कोटेशन नं. ५६२७९०००७११३-७ हा आहे. अद्याप वीज जोडणी तर मिळाली नाहीच परंतु वरुन वीज बिलापोटी त्यांना ३४ हजार ४७० रुपये चे वीजबिल आले असल्याने वीज वितरण कंपनीच्या प्रतापाबद्दल संबंधित शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

एकीकडे आधीच बळीराजा वर्षभर संकटाचा सामना करत असतो, त्यात कोरडवाहू शेती. त्यामुळे त्यात काही परवडत नसल्याने संसाराचा गाडा कसा हकावा हा प्रश्न सदर शेतकऱ्यापुढे ठाण मांडून असल्याने त्यांनी आहे. तेवढ्याच शेतीत बागायती करुन कसाबसा व्यवहार ढकलावा म्हणून आणि अधिकृत आपापली वीज जोडणी असावी या हेतूने सात वर्षांपूर्वी रितसर कोटेशन भरले, परंतु अद्यापही वीज जोडणी मिळाली नसल्याने नाहक नुकसान सहन करत चौथाईने दुसऱ्याचे मोटारीचे पाणी घेऊन त्यांनी ऊस, गहू या पिकांची आपल्या शेतीत लागवड केली आहे. तेच जर आज स्वतः चे वीज कनेक्शन असते तर दुसऱ्याला चौथाई माल द्यायची गरज नसती आणि वरुन तब्बल साडे चौतीस हजार रुपयेचे वीज बिल आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!