🕒 1 min read
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पुणे शहर हे पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरतं का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमुळे पुण्यात लॉकाडाऊन लागण्याच्या हालाचलींनी वेग आला आहे.
विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे. तसेच पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत राहणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. सकाळी १० वाजता ही बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला पुण्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला जाईल. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या बैठकीतून काय निर्णय घेतले जातात.
पुण्यात लॉकडाऊनबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे, त्यामुळे आज लॉकडाऊन जाहीर केला जाणार का? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही? याबाबत बैठक पार पडेल. या बैठकीनंतर पुण्यातील लॉकडाऊनबद्दलची माहिती समोर येईल.
पुणे शहरात गुरुवारी नव्याने १५०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात १३२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी १०८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून वृद्धाची ७० हजारांची फवणूक
- अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या जवळ
- पतीच्या नात्यातील तरुणाचा महिलेवर अत्याचार; आरोपीला ४ दिवसांची पोलिस कोठडी
- मनपा प्रशासकांनी शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी : आमदार बागडे
- मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर अवलोकन बैठक घ्या-राजेंद्र दाते पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
