Share

Sanjay Raut : अब सब को सभी से खतरा; फडणवीस-शिंदेंना टॅग करत संजय राऊतांचं सूचक ट्वीट

Published On: 

Sanjay Raut  । मुंबई : शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेनेत गळतीच सत्र सुरूच आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला. शिवसेनेत आता १५ आमदार उरले आहेत. मात्र असं असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना टॅग करत सूचक ट्वीट केलं आहे.

संजय राऊत हे सातत्याने ट्वीटच्या माध्यमातून किंवा सभेतून टीका करत असतात. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात की, अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं – जौन एलिया. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि प्रियंका गांधींनाही टॅग केलं आहे. शिंदेंनी बंड केल्यापासून आतापर्यत रोज संजय राऊत शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या मातोश्री वरील बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये भावना गवळी – यवतमाळ वाशिम, हेमंत जाधव – परभणी, संजय महाडिक – कोल्हापूर, हेमंत पाटील – हिंगोली, श्रीकांत शिंदे – कल्याण-डोंबिवली, कृपाल तुमाने – रामटेक, कलाबेन डेलकर – दादरा-नगर-हवेली अशी नावे समोर आली आहेत. त्यामुळे हा आता शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख व प्रमुख नेते पक्ष बांधणीची कामे करत आहेत. तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत.

संजय राऊत ट्वीट

अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं.. जौन एलिया.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!