कोल्हापूर : गेले काही महिने राज्यात ईडीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईडीच्या कारवायांवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयप्रमाणेच ईडीला देखील राज्यात येण्याआधी परवानगी घ्यावी लागेल अशी तरतूद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
‘ज्या पद्धतीने सीबीआयला महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते. तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याची गरज आहे,’ असं वक्तव्य त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. ‘ईडीचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर मलाही नोटीस दिली. एकनाथ खडसे यांनाही नोटीस दिली आहे. त्यांनतर संजय राऊत यांच्या पत्नी यांनादेखील ईडीने नोटीस दिली आहे. हे सर्व सूडबुद्धीने होत आहे. ज्या पद्धतीने सीबीआयला महाराष्ट्रात परवानगीशिवाय येता येणार नाही, असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याची गरज आहे.’ असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, उगाच कांगावा कशाला करताय?’
- ‘धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा!’
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- नव्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तोडले जिओचे टॉवर
- राजकीय दुकानदारी बंद होण्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचा कृषी कायद्यांना विरोध- फडणवीस


