औरंंगाबाद : कुख्यात गुन्हेगार मोहम्मद अनिस उर्फ बोक्या मोहम्मद हनिफ (वय ३५,रा. कासंबरी दर्गाह परिसर, पडेगाव) याने हॉटेल व्यावसायीकास मारहाण करीत जवळपास पावणेदोन लाख रूपयांचा ऐवज हिसकावून नेला. ही घटना २३ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हॉटेल शांग्रीला येथे घडली.
सलीम अकबर अली कुडचीवाला (वय ६१,रा.शिरीन व्हिला, दिल्लीगेट परिसर) यांचे मध्यवर्ती बसस्थानकासमोर हॉटेल शांग्रीला आहे. २३ जूनच्या रात्री सलीम अकबर अली कुडचीवाला हे आपल्या हॉटेलमधील कार्यालयात बसले असतांना मोहम्मद अनिस उर्फ बोक्या हा कार्यालयात घुसला.
त्याने हॉटेल मालक सलीम अकबर अली कुडचीवाला यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील जवळपास १ लाख ५० हजार रूपये किंमतीची पाच तोळ्याची सोन्याची चैन, ३० हजार रूपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम ५ हजार रूपये असा ऐवज हिसकावून नेला. सलीम अकबर अली कुडचीवाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद अनिस उर्फ बोक्या याच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक संतोष राऊत करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

